वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥
ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥
चातक पाखरूं। त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥३॥
तुका म्हणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥४॥
अर्थ
देवा तुझी ख्याती अशी आहे की तुझ्या कृपा आशीर्वादाने वांज गाय देखील दूध देते. पण देवा मी तुला अशी संसारिक गोष्ट मागणार नाही मला फक्त तुझ्या चरणांचे दर्शन दे एवढेच. चातक पक्षासाठी पावसाच्या एका थेंबाची गरज असते परंतु त्याच्यासाठी मेघ भरपूर प्रमाणात वृष्टी करतो. राजहंस नावाच्या पक्षाला अमोलिक मोती खाणे आवडते. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्राम्हणदेवा मी असे बोलल्या मुळे तुम्हाला एवढे का बरे बोचले. .(तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे.)
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.