उपदेश तो भलत्या हातीं ।
झाला चित्तीं धरावा ॥१॥
नये जाऊं पात्रावरी ।
कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥
स्त्री पुत्र बंदीजन ।
नारायण स्मरविती ॥२॥
तुका म्हणे रत्नसार ।
परि उपकार चिंधीचे ॥३॥
अर्थ
उपदेश करणारी व्यक्ति ही कोण आहे ते न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवा .जसे नाराळाच्या कारवंटीच्या आंतिल मधुर चविचे पाणी व खोबरे खाऊन करवंटि टाकून देतो, त्याप्रमाणेच पत्नी, पुत्र किंवा नोकर यांनी भक्ती मार्ग दाखविला तरी तो आचरणात आणावा .तुकाराम महाराज म्हणतात, जसे मौल्यवान रत्न चिंधिमध्ये गुंडाळून चिंधीची काळजी घेतली जाते, तसे उपदेश करणारी व्यक्ती सामान्य जरी असली तरी श्रेष्ट मानावा .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.