उशीर कां केला – संत तुकाराम अभंग – 1182

उशीर कां केला-संत तुकाराम अभंग – 1182


उशीर कां केला । कृपाळुवा जी विठ्ठला ॥१॥
मज दिलें कोणा हातीं । काय मानिली निंश्चिती ॥ध्रु.॥
कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं स्थिर ॥२॥
तुका म्हणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥३॥

अर्थ

हे कृपाळू विठ्ठला मला भेटण्या विषयी तुम्ही इतका उशीर का केलास मला कोणाच्या तरी हाती स्वाधीन करून तुम्ही निश्चिंत झाला आहात काय? मी कोठ पर्यंत धीर धरू आणि माझे मन तरी कुठपर्यंत स्थिर करू .तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझा जीव काकुळतीला येऊन तुमची करुणा भाकत आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उशीर कां केला-संत तुकाराम अभंग – 1182

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.