धाकुटयाच्या मुखीं घांस घाली – संत तुकाराम अभंग – 118

धाकुटयाच्या मुखीं घांस घाली – संत तुकाराम अभंग – 118


धाकुटयाच्या मुखीं घांस घाली माता ।
वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥
ऐसें जाणपणें पडिलें अंतर ।
वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥
दोन्ही उभयतां आपणचि व्याली ।
आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥
तुका म्हणे अंगापासूनि निराळें ।
निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥

अर्थ
आई धाकट्या मुलाला प्रेमाने घास भरवते, तर मोठ्या मुलाला हक्काने काम सांगते .मुलाचे जाणतेपण वाढु लागले की त्याची समज पाहुन आई त्याच्याकडे जरा दुर्लक्ष करते .दोन्ही मुलांना तिनेच जन्म दिलेला असतो; पण दोन्ही मुलांच्या प्रेमात मात्र फरक पडतो .तुकाराम महाराज म्हणतात, प्रेमाने जवळ येणाऱ्या मोठ्या मुलाला दूर सारून आई राडणाऱ्या धाकट्या मुलाला जवळ घेते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


धाकुटयाच्या मुखीं घांस घाली – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.