माझे मज कळों- संत तुकाराम अभंग – 1175

माझे मज कळों- संत तुकाराम अभंग – 1175


माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥१॥
आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥
वाचा वदे परी करणें कठीण । इंद्रियां अधीन जालों देवा ॥२॥
तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥३॥

अर्थ

हे पांडुरंगा माझे मन सारखे विषयांकडे धाव घेतात माझे अवगुण मला कळून येतात पण मी काय करू ते तूच मला सांग .त्यामुळे हे नारायणा माझे मन जर विषयांकडे धाव घेऊ लागले तर त्यांना तु आडवा उभा हो त्याला विषयांकडे धाव घेऊ देऊ नकोस. आणि तुला दया संधू म्हणतात तर तुझ्या या ब्रीदाला तू खरे करून दाखव. माझी वाचा परमार्था विषयी खूप गप्पा मारते परंतु तसे वागणे तर अवघड आहे कारण मी इंद्रियांच्या अधीन झालो आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी जसा असेल तसा असो पण मी कसाही असो तुझा दास आहे त्यामुळे हे मायबापा तू माझी उपेक्षा करू नकोस.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

माझे मज कळों- संत तुकाराम अभंग – 1175

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.