बोलोनियां काय दावूं – संत तुकाराम अभंग – 117

बोलोनियां काय दावूं – संत तुकाराम अभंग – 117


बोलोनियां काय दावूं ।
तुम्ही जीऊ जगाचे ॥१॥
हेचि आतां माझी सेवा ।
चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥
विरक्तासी देह तुच्छ ।
नाहीं आस देहाची ॥२॥
तुका म्हणे पायापाशीं ।
येईन ऐसी वासना ॥३॥

अर्थ
देवा मी तुम्हांला काय बोलून दाखवू?तुम्हींच सर्व जगाचे जीवन आहात.तुमची सेवा म्हणजे तुमचे चिंतन आहे देवा.महाराज म्हणतात विरक्त देहाला देह तुच्छ वाटतो त्याला देहाची आसक्ती नसते.तुकाराम महाराज म्हणतात माझी अशी वासना आहे कि मी तुमच्या पाया पाशी येईन.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


बोलोनियां काय दावूं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.