गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥
काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥
अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥२॥
तुका म्हणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड ॥३॥
अर्थ
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर खाल्ली या न्यायाने गाजराची पुंगी तयार करण्यासाठी काही कष्ट करावे लागत नाही आणि समजा गाजराची पुंगी नाही वाजली तर ती खाऊन टाकली तरी चालते, त्याप्रमाणेच या जगामध्ये अध्यात्म करताना कोणत्याही प्रकारची गुरुभक्ती, हरिभक्त न करता अनेक नवनवीन साधू तयार झाले आहेत. देहामध्ये अभिमान त्यांनी जतन केला आहे. अशा लोकांनी कितीही पाठ पाठांतर केले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. या अशा माणसांच्या ठिकाणी ज्ञान कमी असते परंतु त्यांच्या अंगी अभिमानाचा ताठा फार मोठा असतो .तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे लंड म्हणजे अभिमान वृत्तीच्या माणसांचे हाणून मारून तोंड फोडा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.