चित्त तें चिंतन कल्पनेची धांव – संत तुकाराम अभंग – 116

चित्त तें चिंतन कल्पनेची धांव – संत तुकाराम अभंग – 116


चित्त तें चिंतन कल्पनेची धांव ।
जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥
हात पाव दिसे शरीर चालतां ।
नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥
रवीचिये अंगीं प्रकाशक सकळा ।
वचनें निराळा भेद दिला ॥२॥
तुका म्हणे माप वचनाच्या अंगीं ।
सौख्य काय रंगीं निवडावें ॥३॥

अर्थ
इंद्रियांचे जेणे हाव वाढते ते म्हणजे कल्पना करून चिंतन करते तेच चित्त आहे.हात पाय शरीर हे चालताना दिसते देवाण घेवाण करताना दिसते पण जीवाची त्या ठिकाणी सत्ता असते.सूर्‍या पासून सर्वांना प्रकाश मिळतो पण सूर्य आणि किरण असे उच्चार होते.तुकाराम महाराज म्हणतात कि, शब्द निर्माण होते व अस्तित्वाला काल्पनिक मर्‍यादा व माप पडते पण जर मौन धरले तर त्या मधील भेद कसे निवडणार.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


चित्त तें चिंतन कल्पनेची धांव – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.