विटंबिला भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥
खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥
तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥२॥
तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥३॥
अर्थ
कंसाने बालकृष्णास मारण्यास महाबळ भट नावाच्या ब्राम्हणस पाठविले. तो आल्यानंतर नंद यशोदेने त्याला बसण्यासाठी पाट दिला. आपण मोठे त्रिकालज्ञानी ज्योतिषी आहोत असे तो म्हणाला असे म्हणून नंद-यशोदाला त्याने मोहित केले. आणि नंतर त्याने श्रीकृष्णाचे मुद्दाम विरुद्ध भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यावेळी भगवंताने तो ज्या पाटावर बसला होता तोच मायेने उडविला आणि त्या भटाच्या पाठीवर बसविला म्हणजे जोरात मारला. तो खोटे बोलत होता त्याचा अंतर्भाव पाहून श्रीकृष्ण विश्वंभराला ते सहन झाले नाही .ज्या प्रकारचे खोटे भविष्य तो भट सांगत होता त्या प्रकारचे दान त्याला देण्यास भगवंताने सुरुवात केली .तुकाराम महाराज म्हणतात नंतर देवाने पुतणाला ही मारले तिच्या स्तनातील दूध पिऊन तिचा प्राण ही देवाने पिऊन टाकला.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.