आतां केशीराजा हेचि – संत तुकाराम अभंग – 115
आतां केशीराजा हेचि विनवणी ।
मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
देह असो माझा भलतिये ठायीं ।
चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥
काळाचें खंडण घडावें चिंतन ।
तनमनधन विन्मुखता ॥२॥
कफवातपित्त देहअवसानीं ।
ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥३॥
सावध तों माझीं इंद्रियें सकळ ।
दिलीं एका वेळे हाक आधीं ॥४॥
तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता ।
येथें ऐक्यता सकळांसी ॥५॥
अर्थ
हे केशीराजा तुझ्या चरणी मस्तक ठेऊन मी अशी विनंती करीत आहे की,माझा देह कोणत्याही ठिकाणी असो मात्र चित्त फक्त तुझ्या चरणी असू द्यावे.तन मन धन या बाबतीत माझे मन विन्मुख होऊन माझा सर्व काळ तुझ्या चिंतनात जावा.कफ वात व पित्त हे माझ्या देहात असून अंतःकाळी तुम्ही ते निवारण करावे.जो पर्यंत माझी इंद्रिये सावध आहे तो पर्यंतच एक वेळा तुम्ही मला हाक मारा.तुकाराम महाराज म्हणतात देवा सकळांचा जनिता निर्माता तुच आहे आणि सगळे तुझ्यातच ऐक्य पावणार आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आतां केशीराजा हेचि – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.