न मनी ते ज्ञानी न मनी ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावे ॥१॥
धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरी तो लेश प्रेम नाही ॥ध्रु.॥
न मनीं ते योगी न मनी ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥२॥
तुका म्हणे तया नमन बाह्यात्कारी । आवडती परि चित्तशुद्धी ॥३॥
अर्थ
जे लोक मनात वेगळे आणि वागताना वेगळे वागतात असे माणसे ज्ञानी असो वा पंडित असो मी त्यांना मानत नाही .असे लोक स्वतःचा देह पोसतात आणि दुसर्याला उपदेश करतात परंतु त्यांच्या अंतकरणात प्रेमाचा लवलेशही नसतो. ज्यांच्याकडे प्रपंचाची भरपूर साधने असतात अशा योगी आणि हरिदास यांना मी मानत नाही .तुकाराम महाराज म्हणतात मी या ज्ञानी ,पंडित ,योगी ,हरिदास यांना बाह्यतः नमस्कार करतो परंतु मला ते आवडतात ज्यांची चित्तशुद्धी झाली आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.