कां रे माझीं पोरें म्हणसील – संत तुकाराम अभंग – 1139
कां रे माझीं पोरें म्हणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥१॥
कां रे गेलें म्हणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ गेलियाचा ॥ध्रु.॥
कां रे माझें माझें म्हणसील गोत । न सोडविती दूत यमाहातीं ॥२॥
कां रे मी बळिया म्हणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥३॥
तुका म्हणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाई पांडुरंगा ॥४॥
अर्थ
अरे माझी पोरी ,माझे गुरेढोरे असे काय म्हणतोस ?ज्यांनी तुला जन्म दिले आहे ते आईबाप तरी तुझे आहेत काय ?कोणी जर गेले तर तू व्यर्थ तळमळ आक्रोश का करतोस ,अरे माझे हे आप्त, गोत्र असे म्हणत तु बसलास, हेच लोक तुला तुझ्या अंतकाळी यमाच्या हातून सोडणार नाहीत. तू स्वतःला मी फार बलवान आहे असे का म्हणून घेतो आणि तू जर खरच बलवान आहेस तर मग तुला मेल्यावर सरणावर उचलून का ठेवावे लागते ?तुकाराम महाराज म्हणतात अरे तू स्वतः विषयी काहीच भरवसा धरु नकोस त्यामुळे तू लवकरात लवकर पांडुरंगाला शरण जा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कां रे माझीं पोरें म्हणसील – संत तुकाराम अभंग – 1139
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.