राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसे चोहोटां आदरेशीं ॥१॥
न करी स्नान संध्या न म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्नीशी ॥ध्रु.॥
देवाब्राम्हणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥
सुगंध चंदन सांडोनियां माशी । बैसे दुगपधीशीं अत्याआदरें॥३॥
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीन । कां रे रामराणा विसरसी ॥४॥
अर्थ
काही माणसे असे आहेत की त्यांना देव दर्शन घेण्यासाठी देवळात जाण्यासाठी त्रास वाटतो परंतु चव्हाट्यावर बसून लोकांच्या टवाळ्या करण्यास मात्र त्यांना आनंद वाटतो. त्या मनुष्याला स्नानसंध्या करण्याची आवडत नाही. राम राम हा मंत्र मुखाने ते कधीही म्हणत नाहीत परंतु गुडगुडी किंवा बिड्या अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस ओडण्यासाठी ते तयार असतात या व्यसनाविषयी त्यांना विशेष प्रेम वाटते .देव आणि ब्राम्हण यांच्या चरणावर हा कधीही लोटांगण घालणार नाही परंतु दासींच्या चरणावर हा प्रेमाने लोटांगण घालतो .चंदनाचा सुगंध सोडून माशी मोठ्या आवडीने दुर्गंधी पदार्थावर बसते .तुकाराम महाराज म्हणतात अरे भाग्यहीना तू शूद्र भोगासाठी रामरायाला का बरे विसरलास?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.