देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥
गाईचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥
लेकराची गांड स्वयें धांवें क्षाळूं । न म्हणे प्रक्षाळूं द्वीज पाय ॥२॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
अर्थ
देवाचे वस्त्र जर फाटले तर नवे आणावे असे कधीच वाटत नाही पण निर्लज्ज मनुष्य त्यांच्या बायकोला उंच नवी साडी आपण होऊन आणतो .गाईचे पालन करावे असे मनात विचार चुकून सुद्धा येणार नाही परंतु लालसेने घोड्याचा खरारा मात्र नक्की करतो .एखाद्या मनुष्याच्या लेकराने संडास केली तर तो स्वतः धुण्यास धाव घेतो पण ब्राम्हणाचे पाय धुवावे असे तो कधीही म्हणत नाही .तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसांच्या तोंडावर थुंकावे हे माणसे नरकवास भोगण्यासाठीच यमाकडे जातात.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.