चित्तीं नाहीं तें जवळीं – संत तुकाराम अभंग – 111

चित्तीं नाहीं तें जवळीं – संत तुकाराम अभंग – 111


चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय ।
वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥
प्रीतीचा तो वायु गोड लागे मात ।
जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥
तुका म्हणे अवघें फिकें भावाविण ।
मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥

अर्थ
जे मनातच नाही, ते जवळ असूनही उपयोग नाही, गाय ज्याप्रमाणे वासरू मोठे झाल्यावर त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही अगदी त्या न्यायाने .अंतर्‍यामि जिव्हाळा असलेल्या दोन अंतरंगातील व्यक्ती एकमेकंपासून दूर असल्या तरी त्यांच्यामध्ये प्रेम असते .तुकाराम महाराज म्हणतात , की अन्न जसे मिठावाचुन बेचव असते, तसे चित्तामधे भक्तीभाव नसेल तर परमार्थ होने कठिण असते .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


चित्तीं नाहीं तें जवळीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.