देव भक्तालागीं करूं – संत तुकाराम अभंग – 1101
देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥
भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥
स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा । यालागीं कर्कशा करुनी ठेवी॥२॥
तुका म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥
अर्थ
देवभक्तांना संसार करू देत नाही कारण भक्त जर संसार करू लागले तर ते भक्ती करणार नाही त्यामुळे देव प्रतिकूलता निर्माण करतो .भक्ताचे जर भाग्य उजळावे तर त्या भक्ताला अभिमान निर्माण होतो त्यामुळे देव त्याला करंटा करतो. बायको जर गुणवती द्यावी तर तो तिच्या मोहात पडतो त्यामुळे देव त्याला बायको किरकिर करणारी देतो .तुकाराम महाराज म्हणतात या गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे त्यामुळे याविषयी मी इतरांना अधिक काय सांगू?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
देव भक्तालागीं करूं – संत तुकाराम अभंग – 1101
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.