दुधाळ गाढवी जरी – संत तुकाराम अभंग – 1100
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची ती कळा काय जाणे ॥ध्रु.॥
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥
अर्थ
गाढवीनीने दूध दिले तरी त्या दुधाची बरोबरी गाईच्या दुधाशी होईल काय? कावळ्याच्या गळ्यामध्ये पुष्पांचा हार घातला तरी त्याला हंसाचे रूप येईल काय ?मर्कटाने जरी अंगाला बारा टिळे लावले तरी त्याला ब्राम्हणाप्रमाणे वर्तन करता येईल काय ?तर येणार नाही .तुकाराम महाराज म्हणतात ब्राम्हणाने जरी कर्म भ्रष्ट पणा केला तरी तो तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ आहे म्हणजे चांगले कर्म करणाऱ्यांकडून एखादे कर्म चुकून वाईट जरी घडले त्याच्याकडून कर्म भ्रष्ट पानाचे वर्तन झाले तरी तो श्रेष्ठ होय .(या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात ‘तो ब्राम्हण’ म्हणजे नेहमी चांगले कर्म करणारा श्रेष्ठ ब्राम्हण.)
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
दुधाळ गाढवी जरी – संत तुकाराम अभंग – 1100
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.