चाल केलासी मोकळा – संत तुकाराम अभंग – 110

चाल केलासी मोकळा – संत तुकाराम अभंग – 110


चाल केलासी मोकळा ।
बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥
तुज पापचि नाहीं ऐसें ।
नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥
पंच पातकांच्या कोडी ।
नामें जळतां न लगे घडी ॥२॥
केलीं मागें नको राहों ।
तुज जमान आम्ही आहों ॥३॥
करीं तुजसी करवतीं ।
आणिक नामें घेऊं किती ॥४॥
तुका म्हणे काळा ।
रीघ नाहीं निघती ज्वाळा ॥५॥

अर्थ
अरे तू आता हरिभक्ती करण्यास सज्ज झाला आहेस तर चल तुला आता सर्व गोष्टींपासून म्हणजे मायिक पदार्थांपासून मोकळे केले आहे, त्यामुळे वेळोवेळा कायमस्वरूपी विठ्ठल असे बोलत जावेस. असे एकही पाप नाही की जे विठ्ठलाचे नाम घेतल्यावर तुझ्याजवळ राहील. पंचक पतकांच्या सारख्या, कोट्यावधी पथकांच्या राशी असतील तरी विठ्ठल नामाने ते जळून जाण्यास एक घटका देखील लागणार नाही. अरे तू मागे कितीही पाप केले असशील तरी त्या विषयी विचार करू नकोस विठ्ठल नामाने तुझे कल्याण होईल याविषयी आम्ही जामीनदार आहोत. अरे तुला यापुढे देखील जेवढी काही पातके करायचे असतील तेवढी कर अनेक पातके आहेत त्यांचे नाव तरी तुला किती सांगू तेवढे देखील पातके कर परंतु वेळोवेळा विठ्ठलाचे नामस्मरण कर तुला ती पातके बाधा करणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात अरे हरीच्या नामाग्नी मध्ये इतकी ताकत आहे की तेथे काळाला देखील जागा नाही व पातके तर ते भस्म करून टाकते. (या अभंगाचा तात्पर्य अर्थ पाप करावे असे नाही तर हरीच्या नामाचा महिमा सांगण्याचा खरा तात्पर्य आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


चाल केलासी मोकळा – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.