बाळ बापा म्हणे काका ।
तरी तो कां निपराध परिखा ॥१॥
जैसा तैसा भाव गोड ।
पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥
साकरेसि म्हणतां धोंडा ।
तरी कां तोंडा न रुचे ॥२॥
तुका म्हणे आरुष बोल ।
नव्हे फोल आहाच ॥३॥
अर्थ
लहान मूल अज्ञानामुळे बपाला काका म्हणते, म्हणून बापाचे त्याच्यावरील प्रेम कमी होत नाही .भक्तही असाच प्रेमाने नामस्मरण करतो, नाम त्याने वेडेवाकडे जरी घेतले तरी ते भगवंताला आवडते .खडीसाखर दगड म्हणून जरी तोंडात घातली तरी गोडच लागणार नाही काय? त्याप्रमाणे देव कोणत्याही भक्ताची इच्छापूर्ती करतो .तुकाराम महाराज म्हणतात , भक्तिपूर्वक वेडयावाकडया शब्दात केलेले नामस्मरण कधीच वाया जात नाही .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.