जातीचे ते चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥१॥
ते काय गुण लागती येरां । कागा न शोभे पिंजरा ॥ध्रु.॥
शिकविलें तें सुजात सोसी । मग मोल चढे त्यासी ॥२॥
तुका म्हणे वेषधारी ॥ हिजड्या नव्हती त्या नारी ॥३॥
अर्थ
जे आपल्या जातिचे(हरी भक्तां विषयी महाराज बोलतात) असतात त्यांच्याविषयी प्रेम अधिकच वाढते .पोपट हा पक्षी आपण पाहिला आहे त्याला जर आपण राम राम म्हणा यास शिकवली तर तो राम राम म्हणतो म्हणून त्याविषयी अधिक आनंद वाटतो .आणि हे गुण इतरांना लागू पडणार आहे काय म्हणजे कावळ्याला जर सोन्याच्या पिंजर्यात ठेवले तर ते शोभणार आहे काय तर नाही. जे उत्तम जातीचे आहेत तेच चांगले गुण ग्रहण करतात त्यामुळे त्यांना महत्त्व वाढते .तुकाराम महाराज म्हणतात जरी हिजड्याने चांगल्या प्रकारच्या साड्या नेसल्या तरी ते उत्तम जातीची स्त्रि बनू शकत नाही.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.