ज्यासी आवडी हरीनामांची । तोचि एक बहु शुचि ॥१॥
जपे हरीनाम बीज । तोचि वर्णांमाजी द्विज ॥२॥
तुका म्हणे वर्ण धर्म । अवघें आहे सम ब्रम्ह ॥३॥
अर्थ
ज्याला हरिनामाची आवड आहे तोच एक पवित्र आहे. जो मनुष्य वेदाचे बीज हरिनाम सदासर्वकाळ जपतो तो चारी वर्णा मध्ये खरा ब्राम्हण होय. तुकाराम महाराज म्हणतात सर्व प्रकारची वर्णधर्म हे समान असून एक ब्रम्हच आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.