संत तुकाराम अभंग

बोलिलों तें कांहीं तुमचिया – संत तुकाराम अभंग – 106

बोलिलों तें कांहीं तुमचिया – संत तुकाराम अभंग – 106


बोलिलों तें कांहीं तुमचिया हिता ।
वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥
वाट दावी तया न लगे रुसावें ।
अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
निंब दिला रोग तुटाया अंतरीं ।
पोभाळितां वरी आंत चरे ॥२॥
तुका म्हणे हित देखण्यासी कळे ।
पडती आंधळे कूपामाजी ॥३॥

अर्थ
मी तुम्हाला तुमच्या हिताच्या काही गोष्टी सांगतांना अधिक-उणे बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा .जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसु नये; नाहीतर आपलेच नुकसान होते.वैद्याने पोटशूळावर कडूनिंबाचा रस दिला, तर तो पोटात न घेता पोटा वर चोळला तर रोग बरा होणार नाही .तुकाराम महाराज म्हणतात , डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मुर्ख मात्र संकटाच्या गर्तेत कोसळतात .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


बोलिलों तें कांहीं तुमचिया – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *