तारूं लागलें बंदरीं – संत तुकाराम अभंग – 1053

तारूं लागलें बंदरीं – सं तुकाराम अभंग – 1053


तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥
लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥
जाला हरीनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥२॥
तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥३॥

अर्थ

चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर नावाचे बंदर आहे व त्या ठिकाणी विठ्ठल रुपी जहाज लागले आहे. हे संतांनो त्या विठ्ठलनाम रुपी जहाजामध्ये परमार्थ धनाच्या पुष्कळ राशी आहेत त्या तुम्ही लुटा या विठ्ठलनाम रुपी जहाजाला हरिनाम रुपये मोठे शिड लागले आहे. तुकाराम महाराज म्हणतात या हरिनाम रुपी जहाजा मध्ये ओझे वाहणारा मी एक हमाल आहे


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

तारूं लागलें बंदरीं – संत तुकाराम अभंग – 1053

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.