शुकसनकादिकीं उभारिला – संत तुकाराम अभंग – 105

शुकसनकादिकीं उभारिला – संत तुकाराम अभंग – 105


शुकसनकादिकीं उभारिला बाहो ।
परिक्षिती लाहो दिसां सातां ॥१॥
उठा उठी करी स्मरणाचा धांवा ।
धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥
त्वरा झाली गरुडा टाकियेला मागें ।
द्रौपदीच्या लागें नारायणें ॥२॥
तुका म्हणे करी बहुत तांतडी ।
प्रेमाची आवडी लोभ फार ॥३॥

अर्थ
शुक-सनकादिक ऋषींनी आपले दोन्ही ही बाहु उभारुन सांगितले कि, पण परिक्षिति त्याच्या साधनेमुळे मात्र सात दिवसांत कृतांत झाला .तसे तुम्ही उठता-बसता हरिनाम स्मरण करा, मग तुमच्या भेटिसाठी हरी धीर धरणार नाही .द्रोपदीच्या आर्त मनाने केलेला धावा एकूण गरुडाची चाल देखिल मंद आहे, हे जानवल्यावर श्रीकृष्ण स्वतः धावत आले .तुकाराम महाराज म्हणतात , आपल्यावर नीतांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्याची आतुरता देवाला लागलेली आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


शुकसनकादिकीं उभारिला – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.