तुज म्हणतील कृपेचा – संत तुकाराम अभंग – 1044
तुज म्हणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥
आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥
आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥२॥
प्रेमरसपान्हा पाजीं माझे आई । धांवें वो विठाई वोरसोनि ॥३॥
तुका म्हणे माझें कोण हरील दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥४॥
अर्थ
हे पांडुरंगा, तुम्ही कृपेचे सागर आहात तरी मला भेटण्यासाठी तुम्ही एवढा उशीर का केलास ?हे देवराया तू काय पाहतोस तुला अजूनही माझी दया का येत नाही ?देवा अरण्यांमध्ये हरिणीचे पाडस जसे त्याच्या आईला हाक मारते तसे मी तुला आळवित आहे .हे विठाई तुझ्या प्रेम रसाचा पान्हा तू मला पाज तू धावत माझ्याकडे लवकर ये .तुकाराम महाराज म्हणतात हे पांडुरंग राया तुझ्या वाचून कोण माझे दुःख हरण करीन?
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तुज म्हणतील कृपेचा – संत तुकाराम अभंग – 1045
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.