देती घेती परज गेली – संत तुकाराम अभंग – 104

देती घेती परज गेली – संत तुकाराम अभंग – 104


देती घेती परज गेली ।
घर खालीं करूनियां ॥१॥
धांवणियाचे न पडे हातीं ।
खादली राती काळोखी ॥ध्रु.॥
अवघियांचे अवघें नेलें ।
काहीं ठेविलें नाहीं मागें ॥२॥
सोंगें संपादुनि दाविला भाव ।
गेला आधीं माव वरी होती ॥३॥
घराकडे पाहूं नयेसेंचि जालें ।
अमानत केलें दिवाणांत ॥४॥
आतां तुका कोणा न लगेचि हातीं ।
जाली ते निश्चिती बोलों नये ॥५॥

अर्थ:-

जी देती-घेती बुध्दी होती, ती घर खाली करून देहरुपी घर टाकुन निघुन गेली .अज्ञानरूपी अंधाराची रात्र सरली.आता माझ्या मागे धावत येणाऱ्या काळाच्या हाती मी पडणार नाही .त्याने सर्वच सर्वकाही नेले, काहीही मागे ठेवले नाही .स्वस्वरुपावर पडदा टाकणार्‍या मायेने सोंग संपादन करून जो मायेचा देखावा केला होता , तो गेला . आता पुन्हा वळून देह रुपी घराकडे वळुन पाहू नये, असे झाले आहे आतासर्व उपाध्धीची अनामत रक्कम दिवाणात(हरी) जमा झाली आहे .तुकाराम महाराज म्हणतात, आता मी कोणाच्याही हाती लागणार नाही त्याविषयी मी निच्छित झालो आहे.या अवस्थेचे वर्णनहि करता येत नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


देती घेती परज गेली – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.