येऊं द्या जी कांहीं वेसकरास ।
आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥
जों यावें तों हातचि रिता नाहीं ।
कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥
तुका म्हणे उद्यां लावीन मनेरा ।
जे हे दारोदारां भोंवतीं फिरा ॥३॥
अर्थ
यमाचा एक प्रेषित वेसकराच्या रूपाने, कधीही दानधर्म न करणाऱ्या, हरिनाम न घेणाऱ्या, सदैव संसारात आसक्त असणाऱ्या मांणसास उपदेश करतो.’अहो, मायबापहो, वेसकरासाठी कही पक्कन्नाचा, हरिनामाचा, दानधर्मचा घास आपल्या घरातून बाहेर येऊ द्या .मी जेव्हा-जेव्हा येथे येतो, तेव्हा-तेव्हा (तुम्ही काहीतरी कामात व्यस्त असतात); तुमचा हात रिकामा नसतोच, कधीतरी काहीतरी द्यावे, घ्यावे हे चांगले असते .तुकाराम महाराज म्हणतात, मी देवा कडे जाणारा तुमचा मनरूपी दरवाजा उद्या बंद करिन.मग तुम्ही पशु-पक्षाच्या देहाच्या दारा सभोवति फिरत राहल (जन्ममृत्युच्या फेऱ्यात फिरत राहल ) मायबापा ! .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.