संत तुकाराम अभंग

जोहार जी मायबाप जोहार – संत तुकाराम अभंग – 102

जोहार जी मायबाप जोहार – संत तुकाराम अभंग – 102


जोहार जी मायबाप जोहार ।
सारा साधावया आलों वेसकर ॥१॥
मागील पुढील करा झाडा ।
नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥
फांकुं नका रुजू जालिया वांचून ।
सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥२॥
आजि मायबाप करा तडामोडी ।
उद्यां कोणी घडी राहेना हो ॥३॥
तुका म्हणे कांहीं न चले ते बोली ।
अखरते सालीं झाडा देती ॥४॥

अर्थ:-

मायबापहो, जोहार करतो.मी आपणास जोहार करतो. मी वेसकर तुमच्याकडील कर्म-आकर्मचा सारा मागण्यांसाठी आलो आहे .तुम्हाला नम्र विनंती अशी की, मागील संचित कर्माचा आणि पुढील क्रियमाण कर्माचा प्रमेश्वरासमोर झाडा करावा.सारे भगवंतार्पण करावे.स्वत:जवळ काहीही ठेवण्याचा मोह धरु नये; नाहीतर आमचे धनि तुम्हाला जन्ममृत्युच्या खोड्यात अडकवतील जी, मायबाप! .तुम्ही धन्यासमोर हजर न होता इतरत्र पळु नका.हा कर (सारा) भरला नाही तर धनि शिक्षा करतील.आमच्या धन्याचा हात धरु शेकेल असा जगात कोण आहे का सांगा ! .तरी मायबापहो, आज तुम्ही संचितकर्माचे किडूकमिडूक मोडून तडजोड करावी; कारण उद्या आजचि वेळ राहणार नाही.तुकाराम महाराज म्हणतात अखेरीस जर भगवंताला शरण झले नाही तर सारा भरण्याचे राहून जाईल आणि खोडा घातल्या जाण्याचे चुकणार नाही; म्हणून लगेच सारा भरुन टाका .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


जोहार जी मायबाप जोहार – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *