गायें नाचें वाहे टाळी । साधन कळी उत्तम हें ॥१॥ काय जाणों तरले किती । नाव आइती या बैसा ॥ध्रु.॥ सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥२॥ तुका म्हणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥३॥
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.