संत तुकाराम अभंग

घरीं रांडा पोरें मरती उपवासीं – संत तुकाराम अभंग – 101

घरीं रांडा पोरें मरती उपवासीं – संत तुकाराम अभंग – 101


घरीं रांडा पोरें मरती उपवासीं ।
सांगे लोकांपासीं थोरपण ॥१॥
नेऊनियां घरा दाखवावें काय ।
काळतोंडा जाय चुकावूनि ॥२॥
तुका म्हणे आम्ही जाणों त्या प्रमाण ।
ठकावे हे जन तैसे नव्हो ॥३॥

अर्थ:-

समाज्यात काही लोक असे असतात की, घरात बायका-पोर उपवाशी असतात; पण बाहेर मात्र हे श्रीमंतीचा तोरा मिरवत असतात .कुणी खरच त्याच्या घरी येतो म्हंटला तर ते तोंड चुकवितात .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या माणसांचा दंभिकपणा आम्ही ओळखून आहेत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


घरीं रांडा पोरें मरती उपवासीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *