ऐसें कां जालें तें मज – संत तुकाराम अभंग – 1009
ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥१॥
कैसें तुम्हां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥
भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥२॥
तुका म्हणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुम्हां ॥३॥
अर्थ
देवा या जगामध्ये कीर्तनाची निंदा थट्टा जिकडे तिकडे होत आहे हे असे का झाले आहे ते मला काही कळत नाही.कीर्तनाची थट्टा-मस्करी जिकडे तिकडे लोक करत आहेत पण पूर्वी संतांनी सांगितले आहे की तुम्हाला कीर्तन-भजन कथा खूप आवडते म्हणून आणि या लोकांनी संतांची वचने लाजविली आहे हे तुम्हाला बरे कसे वाटते?देवा हे कंटक लोक तुझ्या भक्तभाविकांना त्रास देतात त्यांना ते पिडा करतात हे मी फक्त बोलत नाही तर हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे.तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला तुमच्या नावाचा अभिमानच नाही असे मला वाटायला लागले आहे अहो तुमचे नाव म्हणजेशेवटचा राखीव बाणच आहे ते या लोकांना समजत नाही हे देवा तुम्हाला तुमचा नामाचा अभिमान असेल तर कीर्तनाची थट्टा मस्करी करणार्या तुमच्या भाविक भक्तांना त्रास देणार्या या कंटक लोकांना तुम्ही शिक्षा करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
ऐसें कां जालें तें मज – संत तुकाराम अभंग – 1009
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.