वक्त्या आधीं मान – संत तुकाराम अभंग – 100
वक्त्या आधीं मान ।
गंध अक्षता पूजन ।
श्रोता यति झाला जाण ।
तरी त्या नाहीं उचित ॥१॥
शीर सर्वांगा प्रमाण ।
यथाविधि कर चरण ।
धर्माचें पाळण ।
सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥
पट्ट पुत्र सांभाळी ।
पिता त्याची आज्ञा पाळी ।
प्रमाण सकळीं ।
ते मर्यादा करावी ॥२॥
वरासनीं पाषाण ।
तो न मानावा सामान्य ।
येर उपकरणें ।
सोनियाचीं परी नीच ॥३॥
सोनियाचा पैंजण ।
मुगुटमणि केला हीण ।
जयाचें कारण ।
तया ठायीं अळंकार ॥४॥
सेवका स्वामीसाठीं मान ।
त्याचें नाम त्याचें धन ।
तुका म्हणे जाण ।
तुम्ही संत यदर्थी ॥५॥
अर्थ
परमार्थाविषयी बोलणाऱ्यास आगोदर गंध, फुल, अक्षतादि पुजेचा मान दिला पाहिजे .श्रोता जरी संन्यासी असेल तरी वक्त्याच्या आधी त्याचा मानसन्मान करू नये .ज्याप्रमाणे देहामधे मस्तक श्रेष्ट आहे, म्हणून त्याचे पूजन प्रथम करावे; नंतर क्रमशः हात, पाय यांचे पूजन करावे; असा धर्मादेश आहे आणि तोच सर्वांनी पाळावा .ज्याप्रमाणे पुत्र वयाने जरी बापापेक्षा लहान असला आणि तो राज्याच्या आसनावरती बसलेला असेल तर बाप त्याची आज्ञा पाळतो; त्या प्रमाणे संतांचे वय न पाहता श्रेष्ठत्व पहावी आणि त्यांनाच प्रमाण मानावे .देवाची मूर्ति जरी पाषाणांची असेल तरी ती देव्हार्यातच ठेवावी, देवाची उपकरन चांदी, सोन्याची असली तर ती खाली ठेवावित.देव्हार्यात देव ठेवतात, मौल्यावान भांडी नव्हे .एकान सोन्याचे पैजनी केले आणि काचेचा मुकुटमणि केला तरी पैंजन पायातच आणि मुकुट डोक्यावरच घातला पाहिजे.जेथला अलंकार त्या जागीच घातला पाहिजे .तुकाराम महाराज म्हणतात सेवकांना मालकामुळे नावलौकिक मिळतो, तेच त्याचे धन आहे; त्याच प्रमाणे संतहो तुम्ही मालक आहात आणि मी तुकचा सेवक आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
वक्त्या आधीं मान – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.