अवघे देव साध – संत तुकाराम अभंग – 288

अवघे देव साध – संत तुकाराम अभंग – 288


अवघे देव साध ।
परी या अवगुणांचा बाध ॥१॥
म्हणउनी नव्हे सरी ।
राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥
ऊंस कांदा एक आळां ।
स्वाद गोडीचा निराळा ॥२॥
तुका म्हणे नव्हे सरी ।
विष अमृताची परी ॥३॥

अर्थ
सगळे देव साध्य करता येतील पण जर नीट पाहिले तर आपलेच अवगुण आपल्याला आडवे येतात.त्यामुळे कोणीही कोणाची बरोबरी करू शकत नाही ते एकमेकापासून वेगळे वेगळे राहतात.ऊस आणि कांदा एकाच आळीत लावले तरी त्या दोघांची चव वेगळी आहे.तुकाराम महाराज म्हणतात विष आणि अमृत हे दोन्ही जरी पाण्यापासून बनले असले तरीही त्या दोघांचे व्यवहार भिन्न आहेत.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


अवघे देव साध – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.