तीर्थक्षेत्र त्वरितादेवी (स्वयंभू)
इतिहास – पूर्वी हैदराबादच्या निजामांतर्गत सेवा देणाऱ्या ब्राह्मण सरदारांपैकी जहागिरी गाव तलवाडा, हे गाव गेवराई तहसीलचे मोठे गाव आहे. गावाच्या दक्षिणेस, डोंगराच्या किनाऱ्यावर, त्वरिता देवीचे मंदिर आहे.
वास्तू – श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गौरीपुर तथा गेवराई तालुक्यातील 18 कि. मी अंतरावर असलेले तलवाडा हे छोटेसे गाव. गावाच्या पश्चिमेस मोठा तलाव आहे व त्या लगतच एका मोठ्या टेकडीवर त्वरितामातेचे भव्य दिव्य मंदिर आहे. भव्य दीपमाळी नगारखान्यसाठी तीनकमानीची माडी व दरवाजाच्या आत जाताच उत्तराभिमुख हेमाडपंती देवीचे मंदिर आहे. देवीच्या मंदिरा भोवती चार दीपमाळा आहेत. ह्या दीपमाळा सतराव्या शतकात बांधलेल्या असाव्यात.
मुर्ती – देवीची काळ्या पाषाणाची चतुर्भुजा मुर्ती आहे. देवीच्या हातात शंख,चक्र,गदा,पद्म अशी चार आयुधे आहेत. स्वयंभू मुर्ती आहे.
उत्सव – नवरात्रात दरवर्षी मोठा उत्सव होतो. तसेच या देवीची यात्रा चैत्र वद्य पोर्णिमेला तेल लावून ते चैत्र वद्य अष्टमीस तेल धुतले जाते. कोजागरी पौर्णिमेस जमदग्नी ची पालखी गावातुन मिरवून मग देवीच्या मंदिरात आणुन मग भक्तगण पोत खेळतात.
विशेष – अत्यंत जागरूक देवस्थान म्हणून विख्यात व नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्वरित पावणारी म्हणून त्वरितापूरी देवी असे ओळखले जाते.
View Comments
कृपया पूर्ण पत्ता द्यावा
मुक्काम पोस्ट तलवाडा तालुका गेवराई जिल्हा बीड ..pin 431127
Give complete address of the temple. Thanks