सोमेश्वर मंदिर नाशिक
निसर्गरम्य नाशिक, पवित्र भूमी नाशिक, कुंभमेळ्याचे ठिकाण नाशिक, डोंगर, किल्ले, गिरिस्थाने यांनी वेढलेले नाशिक, दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिकजवळच त्र्यंबकेश्वरता उगम पावते, असा सगळा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या संपन्न असलेला हा नाशिक परिसर
सोमेश्वर मंदिर नाशिकच्या उत्तरेस म्हणजे नाशिक गंगापूर रस्त्यानजिक सुमारे ४ कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या काठी हे भगवान महादेवाचे मंदिर आहे. तेथे स्वयंभू सोमेश्वर प्रकट झाले आहेत. त्या स्थळावर सोमेश्वराचे आद्य मंदिर असून मंदिराखातून गुप्त गंगा वहात असून ती जवळच असलेल्या एका झाडाखालून प्रकट झाली आहे. तिचा प्रवाह अव्याहत चालू असतो. मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आणि नयनमनोहर आहे. दर्शनानंतर गोदावरी नदीत बोटिंग आनंद घेता येतो. पुढे गंगापूरचा धबधबा असून त्याच्या पुढे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटींचा आश्रम व बालाजी मंदिर आहे.
गंगापूर गावाजवळ गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा बघण्यासाठी नाशिककर मोठी गर्दी करतात. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी दक्षिणगंगा अर्थात गोदावरी नदीचे रूप बघण्यासारखे असते. या नदीवरील सोमेश्वर धबधबा हे नाशिककरांचे पसंतीचे ठिकाण आहे. याच धबधब्याला दूधसागर धबधबाही होतात. या धबधब्याचे वैशिष्ट्य म्हणजे खडकावरून कोसळणारे पाणी व रुंदी अधिक असल्यामुळे नयनमनोहर दृश्य बघावयास मिळते. जास्त रुंदीचा धबधबा म्हणून तो परिचित आहे. पोहोण्यासारखे साहस करणे मात्र येथे धोक्याचे आहे फोटोसेशनसाठी हे अत्यंत उत्तम डेस्टिनेशन आहे.