श्री विष्णू मंदिर धोडंबे – shri vishnu mandir dhodanbe

श्री विष्णू मंदिर धोडंबे

नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध अश्या धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले धोलंबे हे साधारण पाच हजार लोक वस्तीचे एक गावं. नाशिकहून मुंबई-आग्रा महामार्गावर ५० कि.मी. अंतरावर वडाळभोई गाव लागते. डाव्या हाताने वडाळभोईतून भायाळेमार्गे धोडबेकडे जाता येते. वडाळीभोईतून थोडंबे हे अंतर आठ कि.मी. आहे तर चांदवड ते घोडंबे हे अंतर २६ कि.मी. आहे. कदरू आणि विनता नदीच्या संगमावर थोडंबे गाव वसले आहे.

धोडप किल्ल्यामुळे गावाला घोडंबे असे नाव पडले असावे तसेच धौम्य ऋषींमुळे गावाला धोडबे हे नाव पडले असेही ग्रामस्थ सांगतात. घोडंबेत महादेव अन् विष्णू यांची शेजारी शेजारी अशी दोन हेमाडपंती मंदिरे असून हे घोडंबेचे वेगळेपण म्हणता येईल.

महादेव मंदिरा शेजारी दीड फूट अंतर सोडून प्राचीन विष्णू मंदिर आहे. या मंदिराचा मुखमंडप पडला असून, समोर ओटा बनविण्यात आला आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. विष्णू मंदिराचे सभागृह म्हणजे एक अनोखा शिल्प सोहळा आहे

सभामंडपाचे छत फुलांच्या झुंबरासारखे असून अतिशय सुंदर आणि रेखीव असे आहे. सभामंडपाची भिंत व छताला जोडणाऱ्या भागात वाद्य वाजविणाऱ्या, कृष्णलीला दाखवणाऱ्या स्त्री प्रतिमा पहायला मिळतात. या शिवाय सभामंडपातील छतावर यक्षिणी छताला आधार देण्या बरोबर वेगवेगळ्या कामात मग्न आहेत.

एक पक्षिणी दोन हातांनी छताला तोलते आहे तर इतर दोन हातांनी आपल्या बाळाला सावरत त्याता दूध पाजते आहे. अंतराळातील छतावर असलेले कालिया मर्दनाचे कृष्णशिल्प तर शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कार म्हणता येईल. गर्भगृहाची द्वारशाखाही नक्षीकाम व देवतांनी सजली आहे. गर्भगृहात भगवान विष्णूची काळ्या पाषाणातील मूर्ती असून इतरही काही मुर्त्या आहेत.

ref : discovermh.com