श्री क्षेत्र बनेश्वर मंदिर नसरापूर
निसर्गरम्य ठिकाणी सुंदर शिवालय, पुष्करणी आणि धर्मशाळा बांधली तर रसिक मंडळीना मन रमविण्यासाठी एक आश्रयस्थान होईल. शिवाय या रम्य वास्तूला तितक्याच रम्य निसर्गाचा शेजार लाभता तर त्याचं सौंदर्य आणखीन खुलेत अशी संकल्पना मनात बांधून नानासाहेब पेशवे यांनी “शिवगंगा नदीच्या तिरावर इसवीसन १७४९ मध्ये हे बनेश्वर मंदिर बांधून घेतले. त्यासाठी पेशव्यांना त्याकाळी १९.४२६ रूपये आणे ६ येथे इतका खर्च आला.
मुख्य बनेश्वर मंदिर चारही बाजूंनी बंदिस्त आवारात बांधलेले आहे. या मंदिराच्या अग्नेय बाजूस एक दरवाजा आहे. या दरवाजातून पाय-या उतरून खाली उतरून आत आल्यावर उजव्या बाजूला पाण्याची दोन कुंडे पाहण्यास मिळतात. त्यापैकी उत्तरेकडील कुंडाच्या पश्चिमेला नंदी मंडपात भव्य नंदी पाहण्यास मिळतो. आणि या नंदी मंडपासमोरच मुख्य बनेश्वर मंदिर आहे. या पुर्वाभिमुख शिवालयाच्या तीन, चार प य-या वर चढून आल्यावर या मंदिराचा सोपा लागतो. सोपा, सभामंडप, व गर्भगृह असे या मंदिराचे तीन भाग आहेत.
बनेश्वर मंदिराचा सोपा तीन खणांचा असून त्यावर चौकोनी शिखर आहे. या सोप्यांच्या स्थावर कमळ पत्रांची नक्षी कोरलेली आहे. सोप्यातील मधल्य खणाच्या छताला एक मोठ्या आकाराची घंटा लटकावलेली आहे. ही घंटा काशाची असून पोर्तुगीज बनावटीची आहे. ही काशाची घंटा वसई मोहिमेचे विजय चिन्ह आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी इसवीसन १७३७ ते १७३९ या कालावधीत उत्तर कोकणातल्या वसई येथील पोर्तुगीजांचा पराभव करून तेथील अनेक चर्च मधून अशा प्रकारच्या अनेक घंटा विजयाचे चिन्ह म्हणून अनेक मंदिरात या घंटा दिलेल्या आढळत. या घंटेवर इसवीसन १६८३ सालचा आकडा व क्रॉसचे चिन्ह पाहण्यास मिळते.
मंदिराचा सोपा ओलांडून पुढे आल्यावर सभामंडप लागतो. या सभामंडपाला एकही खांब नसून हा सभामंडप चार बाजूच्या चार भिंतीवर आधारलेला असून घुमटाने अच्छादलेला आहे. या मंदिराच्या बांधकामातले वैशिष्ट्य जाणकारांना व आपल्याला अवचित करते.
सभामंडपातून गर्भगृहाच्या पाय-या उतरून खाली आल्यावर आपल्याला प्रथम श्री विष्णू व श्री लक्ष्मी यांच्या मूर्त्या पाहण्यास मिळतात. या मूल्यांच्या समोरच उत्तराभिमुखी शिवलिंग आहे. मुख्य म्हणजे हे शिवलिंग एक प्रतिकात्मक असून खरं तर ते एक झाकण आहे. आणि य झाकणाखाली पोकळी आहे. आणि या पोकळीत एक गोलाकार शिला स्थंबावर पाच शिवलिंगे कोरलेली पाहण्यास मिळतात. या शिवस्थेबांचा व्यास सुमारे सहा इंच इतका आहे. वास्तविक हेव येथील त खरे शिवलिंग आहे. आणि या शिवलिंगावर सतत पाणी वाहात असतं. पण गर्भगृहात खुपच अंधार असल्यामुळे हे शिवलिंग आपल्याला नीट दिसत नाही..
बेताच्या किंवा मोठ्या आकाराच्या पानावर कापूर लावून ते पान पोकळीतील पाण्यावर सावकाश सोडले तर हे शिवलिंग स्पष्ट पणे दिसते. हे पाणी या शिलारथबाच्या बाजूने सतत वाहात असते. बनेश्वर मंदिरातील पाण्याचा चक्रव्यूह हा प्रकार अद्भुत असून अत्यंत मनोवेधक आहे. सर्वप्रथम सर्व झ-यांचं पाणी एकत्र करून यातील पाणी एका कोनाडयावाटे एका हौदात जमा होते. या हौदाच्या शेजारी सुमारे १५ फुट औरस चौरस चिरेबंदी कुंड आहे. हा तहान हौद भरला की ते पाणी गोमुखावाटे एका चौरसाकृती कुंडात वरुन पडत असतं. आणि या कुंडाच्या शेजारीच याच्यापेक्षा पोठ्या मोठ्या आकाराचे असे एक दुसरे कुठ आहे.
यापैकी पहिल्या कुंडातील पाणी धार्मिक देवधर्मासाठी व पिण्यासाठी वापरतात, तर दुसऱ्या कुंडातील पाणी खानासाठी वापरले जाते. ही दोन्ही कुठे सुमारे १२ ते १५ फूट खोल आहेत. या कुंडामधील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी यात निळसर व जांभळ्या रंगावे मासे सोडलेले आहेत. या माशांना पूर्वी भोर संस्थानातून हरबरे व शेंगदाणे येते असत. आजही रा दोन्ही कुंडात भरपूर मासे पाहण्यास मिळतात, अशा एकूण चार कुडातून हे पाणी खेळवलेले आहे. तसेच या मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या समोरच मोकल्या आवारात सडेपाच फूट उंचीचा भव्य त्रिशूल उभारलेला आहे.
पुण्याच्या दक्षिणेस सुमारे ३० कि. मी. अंतरावर, शिवगंगेच्या काठावर, गर्द झाडीत, निसर्गरम्य वातावरणात हे सुंदर बनेश्वर मंदिर पेशव्यांनी बांधलेले आहे.