श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)

श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड)

स्थान: जवाहर (बुचर आयलंड), मुंबईचे पूर्वेस
त्पुरुष: बाकाबाई, जरीमरी आई
विशेष: दत्तमंदिर, जरीमरी आई मंदिर

मुंबईच्या पूर्वेस पोर्टट्रस्टच्या मालकीच्या जागेवर ‘जवाहर’ नावाचे एक बेट आहे. पूर्वी याला बुचर आयलंड म्हणत असत. या बेटासमोरच घारापुरी आहे. सन १८५७ मध्ये कोणी एका बाकाबाई नावाची राणी इंग्रजांनी या बेटावर स्थानबद्ध करून ठेविली होती. यावेळी बुचर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या अलिकडच्या खाडीत बाकाबाई जरीमरीची पूजा नित्यनेमाने करीत असे. थोड्याच दिवसात तिच्या भोवती भक्तगण जमू लागले.
पुढे भारत देश स्वतंत्र झाल्यावर हे बेट नाविक दलाच्या ताब्यात आले. औद्योगिक विकास होऊ लागला. लोकांचे येणे जाणे वाढले. जरीमरी आईचे एक छोटे मंदिर तयार झाले. पण आईने तेथे जाण्यास नकार दिला. पण १९५५ मध्ये विश्वस्तांनी या बेटावर दत्तात्रेयांची स्थापना करून त्याची पूजाअर्चा सुरू केली. पुढे दत्तात्रेयांची संगमरवरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली. दत्तजयंतीचा उत्सव सुरू केला. कालातराने या स्थानाचे महत्त्व वाढले. गुळवणी महाराज, तराणेकर महाराज, दत्तमहाराज कवीश्वर, गगनगिरी महाराज इत्यादींनी या स्थानास भेटी दिल्या.
सकाळ-संध्याकाळ आरती, गुरुवारी सामुदायिक भजन, पौर्णिमेस रुद्राभिषेक, दरवर्षी भंडारा-प्रसाद येथे होतो. भाविकांनी या स्थानास देणग्या देऊन त्याचे महत्त्व वाढविले. सन १९८३ मध्ये जरीमरी आई व दत्तात्रेय यांची दोन सुंदर मंदिरे तयार झाली. मंदिराजवळ सोनचाफा व पारिजातक यांची फुले शोभू लागली. आंब्याचे वृक्ष या मंदिराची शोभा वाढवितात. भाविकांना संतोष देणारे हे स्थान आहे.


श्री क्षेत्र जवाहरद्वीप (बुचर आयलंड) समाप्त.


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४