श्री एकमुखी दत्तमुर्ती

कोल्हापूर येथील अतीप्राचीन श्री एकमुखी दत्तमुर्ती

कोल्हापूर शहरातील एमुखी दत्त मंदिरातील दत्ताची मूर्ती १८ व्या शतकात बनवलेली असून नृसिंह सरस्वती महाराज, गाणगापूर; श्रीपाद वल्लभ महाराज आणि नंतर स्वामी मर्थ यांनी या मूर्तीची पूजा केली आहे. मूळ मूर्ती उत्तर भारतातील असून तिची प्रतिष्ठापना कुणी केली ? याची माहिती उपलब्ध नाही. पू. मौनी महाराजांनी (पाटगाव, जि. कोल्हापूर) मंदिराचा जीर्णोद्धार केला. शके १८८६ मध्ये श्री. पांडुरंग गोविंदराव भोसले आणि वर्ष १९९७-९८ मध्ये श्री. अमोल जाधव यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मूर्तीचे वर्णन

पूर्ण मूर्ती महादेव लिंगाच्या आकारात एकाच पाषाणात असून ५ फूट (पूर्ण पुरुष) अशी रचना आहे. मूर्ती पश्‍चिमाभिमुख असून उजव्या बाजूच्या एका हातात जपमाळ, दुसर्‍या हातात कमंडलू, तिसर्‍या हातात डमरू आणि डाव्या बाजूच्या एका हातात त्रिशूळ, दुसर्‍या हातात शंख अन् तिसर्‍या हातात योगदंड आहे. मूर्तीच्या मस्तकावर शिवपिंडी आहे. मूर्ती दगडी चबुतर्‍यावर उभी आहे. मंदिराबाहेरच समोर नंदीसह महादेव मंदिर आहे.

गुरुपीठ आणि मंदिर पंचायतन

या परिवारास मंदिर पंचायतन असे संबोधले जाते. श्रीविष्णु मंदिर, नरसिंह मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर. (एकमुखी) श्री दत्त मंदिर हे पूर्ण गुरुपीठ असून अवधूतस्वरूप आहे, असे मानले जाते. मंदिराच्या शेजारी दक्षिण बाजूस १ सहस्र वर्षापूर्वीचा पिंपळ वृक्ष आहे. या पिंपळ वृक्षामध्ये वड, उंबर आणि अन्य दोन वृक्ष एकाच बुंध्यातून आले आहेत. वटवृक्ष हा दत्तमंदिराकडे झुकला आहे, तर पिंपळ वृक्ष हा दक्षिणेकडील हनुमान मंदिरावर झुकला असून त्याला पारंब्या नाहीत. पिंपळाला औदुंबराप्रमाणे फळे येतात.

शिलालेख

दत्तमंदिरातील दत्तमूर्तीमागील खांबावर एक शिलालेख आहे. सध्या तो बुजवण्यात आला आहे. ओंकारेश्‍वर मंदिरात एक, श्रीराम मंदिराच्या पायरीवर एक, नरसिंह मंदिराच्या खाली भूमीत जोडलेले २ आणि विष्णु मंदिराच्या छतावर एक असे एकूण सहा शिलालेख या मंदिर पंचायतन परिसरात आहेत.

दत्तयागाच्या ठिकाणी खोदकामाच्या वेळी सापडलेले ७०० वर्षांपूर्वीचे यज्ञकुंड

१५.१२.२०१४ या दिवशी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास दत्त महाराजांनी स्वप्नात आदेश दिला, माझी धुनी शाश्‍वत करा! त्या वेळी त्याचा अर्थ समजला नव्हता. अभ्यास करून ज्या ठिकाणी १६.११.२०१४ ते ६.१२.२०१४ या काळात दत्तयाग यज्ञ केला होता, त्या ठिकाणी १७.१२.२०१४ या दिवशी सकाळी खोदण्यास प्रारंभ केला. खोदकाम करतांना त्याच दिवशी सकाळी ११.४५ वाजता यज्ञकुंड दिसून आले. खोदकाम अडीच फूट करावे लागले. खोदकाम जसजसे खाली जात होते, तसतशी उष्णता वाढत होती. त्यामुळे तेथे धुनी असावी, हे खरे आहे. हे यज्ञकुंड ७०० वर्षांपूर्वीचे असावे, असे वाटते. या ठिकाणी दुर्वासऋषींनी साधना केली असून तेव्हापासूनच तेथे धुनी आहे.


श्री एकमुखी दत्तमुर्ती माहिती समाप्त.


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४