सिद्धेश्वर मंदिर अकोले
अकोले शहरात असणारे सिद्धेश्वर मंदिर शोधण्यास आपल्याता विशेष सायास पडत नाहीत. अगदी मंदिराच्या तटात गाडी जाऊ शकते. सिद्धेश्वर मंदिर अकोते कुठेही ऑइलपेटने न रंगवता आणि काँक्रीटचे आधार न तावता नीट जपते आहे. सिद्धेश्वर मंदिर यादवकालीन असून साधारणतः १३ व्या शतकातील असावे, मंदिर भूमिज शैलीतीत असून मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मागच्या बाजूने प्रवेश सुरू आहे आणि सभामंडप कुतूप लावून बंद केला आहे. सिद्धेश्वर मंदिराचा सभामंडप हा तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो. एक मुख्य सभामंडप आणि दोन उपमंडप अशी त्रिदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागरमंथनासारखे काही पुराणप्रसंग, बाह्यभागात अमुदल, गजदत असा सारा खजिनाच तिथे आपल्याला पहायला मिळतो.
सिद्धेश्वर मंदिर १७८० पर्यंत प्रवरा नदीच्या जलाशयाच्या खाली पुरले गेले होते. अठराव्या शतकाच्या अखेरीस केलेल्या उत्खननात याचा शोध लागला. त्याची थोडीफार डागडुजी करावी लागली. मुखमंडपापैकी एकाची पुनर्बांधणी केली गेली. वास्तुशैलीच्या बाबतीत उर्वरित मंदिर अगदी अखंड आहे. मंदिराला नदीच्या कडेला एक आणि जागेच्या दिशेने एक प्रवेशद्वार आहे. हे रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिरासारखे आहे जिथे गर्भगृहाचे प्रवेशद्वार दोन्ही बाजूनी आहे.
मंदिराच्या परिसरात हनुमान मंदिर, महादेव मंदिर व श्रीराम मंदिर ही पेशवेकालीन लहान मंदिरे असून त्यातील हनुमान मंदिरातील मारुतीची मूर्ती सुबक आहे. आपल्याला मंदिर परिसरात अनेक वीरगळी इतरत्र विखुरलेल्या दिसतात. त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अगस्ती ऋषींच्या प्रवरा नदीच्या तीरावरील ऐतिहासिक आणि पौराणीक वारशांप्रमाणेच हे मंदिर देखील अकोले शहराचा ऐतिहासिक वारसा आहे.
ref: discovermh