संत शेख महंमद मंदिर – श्रीगोंदा
श्रीगोंदा म्हटलं कि संताची भूमी,ऐतिहासीक वास्तू सर्व धर्मियांचा एकोपा लक्षात येतो.श्रीगोंद्याला पुर्वी चांभारगोंदे म्हणुन ओळखले जात असे.ते चर्मकार समाजातील थोर संत गोविंद चांभार यांच्यामुळेचं छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनी शेख महमंद बाबा यांच्या आचरणाने प्रभावित होवून.त्यांना चांभारगोंदा (श्रीगोंदा) गावी आणले.त्याकाळी श्रीगोंदा उत्तर वेस,बाजारतळ वेस,काळकाई चौकातील वेस व छत्रपती शिवाजी चौकातील वेस अशा या चार वेशींमध्ये श्रीगोंदा गाव वसलले होते.मालोजीराजे भोसले यांनी श्रीगोंदा गावाजवळच शेख महंमद बाबांना जागा दिली.शेख महंमद बाबा यांनी आपल्या जीवनात अखील मानव जातीला आपल्या सुश्राव्य प्रवचनाद्वारे उत्तम आचारणाद्वारे माणुसकीचा धर्म शिकविला.
माणसाने माणसाला मदत करून त्यांच्या सुख-दुखःत सहभागी होत आपले जीवन जगावे,हा संदेश त्यांनी दिला.जीतीभेद त्यांना माहित नव्हात. संत गोंविद महाराज,राऊळबुवा महाराज,प्रल्हाद महाराज व गोदड महाराज यांनी देखील हाच संदेश दिल्याने पिढ्यानपिढ्या त्यांचे नाव घेतले जाते.गोंविद महाराजांमुळे तर गावाचे नाव चांभारगोंदे पडले.
तत्कालीन राजे देखील शेख महंमद बाबा यांचा सल्ला व आर्शिवाद घेऊ लागले.मालोजिराजे भासले तर शेख महमंद बाबा यांना गुरूस्थानी मानत.शेख महंमद बाबा यांच्या शिकवणीमुळे पिढ्या न पिढ्या श्रीगोंदा नगरीत सर्वधर्म समभाव जोपासला गेला.शासन हल्ली जातीय सलोखा अभियान राबवत असतानां हेच कार्य शेख महंमद बाबांनी सुमारे ५०० वर्षापुर्वी केल्याचे स्पष्ट होत आहे. सर्व धर्म माणुसकीचा संदेश देत असुन, स्वतः बाबांनी धर्माप्रमाणे आचारण करून धर्माची शिकवण आमलात आणुन माणुसकी जपण्याचे आवाहन केले.त्यामुळे अनेक जण प्रभावित होऊन इतरत्र कार्य करू लागले.
शेख महंमद बाबा यांना एकांतवासात आपले धार्मिक कार्य पुर्ण करण्यासाठी श्रीगोंदा गावाजवळ जागातर दिलीच,शिवाय मशिदही बांधून देऊन येणार्या जाणार्या लोकांसाठी धर्मशाळा (आशुरखाना) देखील बांधून दिला.प्रार्थनांचे मार्ग वेगवेगळे असले तरी निर्मिक एकच आहे आणि कोणताही धर्म इतर धर्माची, श्रद्धा असणार्यांचा द्वेष करू नका हाच संदेश देतात. त्याचाच प्रचार प्रवचणातुन नव्हे तर आचरणाने शेख महमंद बाबा यांनी केला.म्हणुनच ते पिढ्या न पिढ्या लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
जीवनाला स्थैर्य आणि मानसिक पराकोटीचे समाधान देणारे श्रीगोंदा येथील सूफी संत शेख महंमद बाबा दर्गा भारत भर प्रसिद्ध आहे.वर्षभर या ठिकाणी अनुयायांची वर्दळ असते.प्रत्येक गुरूवारी श्रीगोंदा परिसर व जिल्ह्यातुन बाबांच्या दर्शनासाठी लोक गर्दी होते. बाबांच्या दर्ग्यात जन आपले दुःख विसवतात, तत्क्षणी मन प्रसन्न होऊन क्लेष,पीडा,दूर झाल्याची जाणीव होते.
यात्रे दिवशी मोठ्या संख्येने लोकांची बाबांच्या मठात रेलचेल असते.यात्रेच्या कालावधीत बॅड पथकासह वाजत गाजत श्रीगोंदा शहरातून मिरवणुकीने बाबांच्या दरबारात येतात व गुलाब पाणी,सुंगधी अत्तर,
संपूर्ण दिवसभर असाच कार्यक्रम चालू असतो,परंतू यात चादर चढविण्याचा पहिला मान श्रीगोंदा पोलिस स्थानकाचा आहे.श्रीगोंदा पोलीस स्थानक व तहसील कार्यालयाच्या वतीने तहसिलदार व फ़ौजदार व त्यांचे सर्व कर्मचारी शुहरातुन मिरवणुकीने वाजत गाजत येवून बाबांना चादर अर्पण करतात.काही नोकरी-धंद्या निमित्त बाहेरगावी गेलेल्या श्रीगोंदे करांना गावाकडे यात्रे (उरूस) निमित्त येण्याची ओढ निर्माण होते.
शेख अब्दुल जिलानी,शेख अब्दुल रज्जाक,ताजोद्दीन कादरी,सय्यद महंमद गौस ग्वालेर, कादरी चॉंद साहेब,कादरी महंमद साहेब अशी शेख महंमद बाबांची गुरू परंपरा आहे.तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसेल हे महंमद बाबांचे शिष्य होते.अशी ईतीहास दप्तरी नोंद आहे.
शेख महंमद बाबा औरंगाबाद येथील दौलताबाद व खुलताबाद या गावी राहिले.
त्या ठिकाणी त्यांचे मुुर्शिद (गुरू) कादरी चॉंद साहेब यांच्या सोबतीत त्यांना आध्यात्मिक शिक्षण मिळाले.
धार्मिक व आध्यात्मिक पारंगत झाले.
दररोज चिंतन,मनन,पठण,करणे अशी त्यांची दिनचर्या होती.
ते गृहस्थाश्रमी होते.संसार चालवून त्यांनी आपली परमार्थाची साधना उत्कुष्ठपणे साधून दाखविली.
श्रीगोंदा येथे त्यांच्या पत्नीची कबरही त्यांच्या शेजारी लागूनच एकाच दर्ग्यात आहे.
शेख महंमद बाबा यांचे गुरू मुर्शिद कादरी चॉंद साहेब (चॉंद बोधले) हे निजाम शाहीतील प्रभावशाली साधू पुरूष होते.
त्यांची समाधी आजही दर्ग्याच्या स्वरूपात देवगिरीच्या पायथ्याशी औंरगाबाद वेरूळ मार्गाच्या उजव्या बाजुस आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले हे शेख महंमद बाबांना आपले गुरू मानत होते.
मालोजीराजे भोसले कोणत्याही कामगिरीवर जाताना शेख महंमद बाबांचा सल्ला,
परवानगी व आर्शिवाद घेतल्या शिवाय कामगिरी पारपाडत नव्हतेे.
श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी शेख महंमद बाबांना श्रीगोंदा (चांभारगोंदे)
येथे आणले व शेख महमंद दुरूवेष मोकादम मौजे चांभारगोंदे यांसी मालोजी राजे भोसले यांनी
सन १००५ हिजरी (१५९५ ते १५९७) मध्ये आपण
मोकादम समस्त दाहीजण कसबे चांभारगोंदे मजकुर याजपासून पाच चाहूर जमीन बारजावरक,
बातीने खरीद करून त्या मध्ये शेख महमंद बाबांसाठी दर्गा (खनकाह) बांधून दिला.
पेठ मकरंदपूर वसऊन त्यामधून बारा बिघे जमीन व गज इलाही बागाईत बादल थल चेलेकराचे
तरी तुम्ही लेकराचे लेकरी (वंश परापंराने) अर्जाणी कर्णे,
यास कोणी हिला हरकत करील तो गुन्हेगार दिवानाचा व गोताचा अन्यांयी.
सनदेत सांगितल्या प्रमाणे आजही शेख महंमद बाबांचे वारसदार मालोजीराजे भोसले यांनी बांधून दिलेल्या दर्गा (खनकाह) मध्ये राहतात.
शेख महंमद बाबा दर्गा व्यवस्थेसाठी बाबांचे वारस
पै.मलगंबुवा हाङ्गि जबुवा शेख व पै.हुसेन (बारकु बुवा)
कमाल शेख,नबिलाल बाबा शेख यांनी संन १९५२ साली शेख महंमद बाबां दर्गा ट्रस्टची स्थापना केली.
दर्गाचा दैनदिन पुजा अर्चा वार्षीक उत्सव,संदल,उरूस बाबांचे वंजश मार्ङ्ग त साजरे केले जातात.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: httpbahujansamtapatra