तीर्थक्षेत्र

संत नामदेव पायरी पंढरपुर, तीर्थक्षेत्र नरसी

संत नामदेव समाधी (पंढरपुर):-

संत नामदेव हे ८० वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी जग सोडून जाण्याचे ठरवले. आषाढ शुद्ध एकादशी शके १२७२ रोजी विठ्ठला पुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली. विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ  आपल्या मस्तकी लावावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधिस्थ झाले .तेथे त्याचे समाधी स्थान  तयार करण्यात आले आहे. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात संत नामदेव पायरी आहे.

.


संत नामदेव मंदिर (नरसी):-

संत नामदेव यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यापासून १५ ते २० किमी दूर नरसी या गावात झाला . या गावाशेजारुन कयाधू नदी वाहते. त्या नदीकाठी संत नामदेवांचे मंदिर आहे.

ह्या गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते.

“गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण।संसारी असोन नरसीगावी।।”

त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणीहेही ह्याच परिसरातले.नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी-बामणी ही ह्या दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानले जाते. नामदेवकृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंतर्भूत आहे.

असा निर्देश सापडतो.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: wikipedia, vikaspedia