संगमेश्वर मंदिर सासवड
सासवड हे पुण्याजवळचे छोटे शहर आहे आणि पुरंदर तालुक्याचे मुख्यालय आहे. पोराणिक कालापासून देवांची व सतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कहामाई व चांबळी (भोगवती) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे. संगमेश्वर मंदिर
सासवड बसस्थानका पासून साधारण १ कि.मी अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे. कन्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याचे नाव संगमेश्वर आहे.
चांबळी (भोगवती) नदीच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी एक लोखंडी पुल तयार केला आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात आलेल्या महापुरामुळे या पुलाची दुरवस्था झाली आहे. पुल ओलांडून गेल्यावर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात. दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर स्थापात्य आणि शिल्प कलेचा अदभुत नजारा दृष्टिस पडतो.
सुरुवातीला बाहेरच पुरातन नंदी दिसतो. त्याच्या समोरच तीस दगडी खांबावर उभारलेला मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दीपमाळा आहेत. मंडपातील भव्य नंदी आहे. मंदिरातील भागात दगडी कासव आणि मंदिरावरील नक्षीकाम सुंदर आहे.
मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. या तुळशीवृंदावनात वरतुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते.
मंदिराच्या दक्षिणेस घाट व कन्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळीच्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.
अप्रतिम माहिती