तीर्थक्षेत्र

संत समर्थ रामदास मंदिर

संत समर्थ रामदास मंदिर -सज्जनगड

प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इ.स.१६७९,पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

संत समर्थ रामदास मंदिर – जांब

हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा प्रदेशाच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातआहे. या गावी समर्थ रामदासांचा जन्म झाला होता. जांब समर्थ हे एक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: ref: wikipedia