संत सेवालाल महाराज मंदिर

संत सेवालाल महाराज मंदिर

संत सेवालाल महाराज मंदिर – पोहरादेवी 

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी येथे जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. जगतगुरु संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ आहे. संत सेवालाल महाराजांना देशभरातील १२ कोटी जनता मानते.

संपूर्ण देशभरातील १० – १२ लाख बंजारा भाविक श्री. राम नवमी यात्रेकरिता या ठिकाणी येतात. संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन घेतात. नवस फेडतात. म्हणून बंजारा समाजातील प्रत्येक नागरिकांच्या घराघरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बाबूलाल महाराजांचा फोटो लावून पोहोरादेवीची पूजा करतात.

पोहोरादेवी हे एक धार्मिक स्थळ आहे. धर्मपीठ आहे games. येथून आम्ही समाजाला संदेश देतो. समाज त्याचे अनुकरणं करतं. चांगल्या रितीरिवाज रुढी परंपरेविषयी प्रथेविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. समाज त्याचे अनुकरणं करतं. संपूर्ण १२ कोटी जनतेची पोहरादेवीविषयी हीच भावना असते.  मुस्लिम धर्मातील प्रत्येक नागरिक हजला एकदा दर्शन करायला जातात. तसेच बंजारा समाजातील व्यक्ती एकदा तरी पोहरादेवीला दर्शन करायला येतो.

संत सेवालाल महाराज मंदिर

संत सेवालाल महाराज मंदिर


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: tv9marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *