तीर्थक्षेत्र

संत निवृत्तीनाथ समाधी

संत निवृत्तीनाथ समाधी – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर

संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर – ज्ञानदेव-सोपान – मुक्ताई या आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी शके १२१८ मधील ज्येष्ठ कृ. त्रयोदशी या दिवशी १७ जून १२९७ रोजी त्र्यंबकेश्‍वर येथे संजीवन समाधी घेतली. समाधीवर इ. स. १८१२ मध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले. मूळ मंदिरातील निवृत्तीनाथांची समाधी व मागे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या