नृसिंह मंदीर भातोडी – narasimha mandir bhatodi

नृसिंह मंदीर भातोडी

नृसिंह मंदीराची स्थापना १३०० – १४०० या काळात झाली आहे. कान्हो नर्सों नावाचे प्रधान है। शाही दरबारात होते. त्यांनी या मंदीराची स्थापना केली आहे. मंदीराला भक्कम तटबंदी करून त्यावर मंदीर बांधलेले आहे. मंदीराचे संपुर्ण बांधकाम दगडी आहे. मंदीराच्या समोर मेहकरी नदी आहे.

या नदीचा उगम जवळील गर्भगिरी डोंगररांगेतील परीसरातुन झालेला आहे. या मंदीराचे प्रतीरुप पाकिस्तानात कराची मधील नरसिंमपाल या भागात आहे असे बोलले जाते. दरवर्षी नृसिंह जयंतीच्या काळात या ठिकाणी जयंती उत्सव साजरा होतो, त्या वेळी राज्य आणि देशभरातून भाविक गावास भेट देतात.

भातोडी गावांना मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासात 1624 मध्ये झालेली भातवडीची लढाई गनिमी काव्यासाठी सुप्रसिद्ध आहे. या लढाईमध्ये महाजीराजेनी मोठा विजय मिळवला, परंतु, या लढाईमध्ये शहाजीराजेंचे धाकले बंधु व छत्रपती शिवरायाचे चुलते शरीफजीराजे भोसले हे धारातीर्थी पडले. शरीफजीराजे भोसले यांचे समाधीस्थळ याठीकाणी आहे.

अहमदनगर शहरा पासून भातोडी गाव नगर-बीड रोडवर 18 कि.मी. आहे.