तीर्थक्षेत्र

moreshwar – अष्टविनायक मोरेश्वर मोरगाव

ashtavinayak moreshwar morgaon information in marathi

अष्टविनायक मोरेश्वर मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर(moreshwar). या गणपती श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.


अष्टविनायक मोरेश्वर मोरगावची माहिती – (moreshwar)

मोरया गोसावींचे वडील वामनभट्ट शाळिग्राम यांनी मोरगावला कठोर तपश्चर्या केली. म्हणून मयूरेश्वर स्वत: त्यांचा मुलगा बनला. तेच पुढे मोरया गोसावी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी मोरगावची वारी सुरू केली. त्यांच्या भक्‍तीने प्रसन्न होऊन मोरया चिंचवडला मंगलमूर्ती बनून आले.

मोरगावला थोर गणेश भक्‍त गणेश योगीन्द्र यांनी चोवीस वर्षे मोरयाची सेवा केली. त्यांचा मोरगावात मठ आहे. त्यांनी गणेश संप्रदायाचा प्रचार व प्रसार चालू केला. गणेश संप्रदायाच्या वाङ्मयाचे संकलन, संपादन, प्रकाशन या सारखी अनेक कामे या मठाने केली.

गणपतीच्या पूजेसाठी राजाराम महाराजांनी मोरगाव इनाम दिले. तेव्हापासून ते चिंचवड ट्रस्टच्या व्यवस्थेत आले. इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त दर्शनाला येतात. भाद्रपद-माघ महिन्यात चिंचवडच्या मंगलमूर्तीची पालखी इथे येते. दसऱ्याला मोठी मिरवणूक निघते. या वेळी दारूकाम प्रचंड होते.

’मनी इच्छीले मोरया देत आहे’ अशी याची ख्याती आहे. मोरगावला ‘भूस्वानंद’ म्हणूनही नावाजतात.


श्री मयूरेश्वर मंदिराची माहिती – (moreshwar)

श्रीगणेशाची प्रथम स्थापना झली ते हे मोरगाव क्षेत्र. श्रीमयूरेश्‍वरापुढे नंदिकेश्वर आहे. हे मोरगावच्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मोरगाव येथे कऱ्हा नदी आहे. कऱ्हेमध्ये स्नान केले की द्वारयात्रेचे फळ मिळते. मंदिरात देवळाच्या जवळ गाभाऱ्याबाहेर श्रीनग्नभैरवाचे छोटे देऊळ आहे त्याचे प्रथम दर्शन घ्यावे व मग गणेशाचे दर्शन घ्यावे. मंदिरात मुख्य देवळाच्या बाजूने ओवऱ्या आहेत. यात मुद्‌गल पुराण या गणेश संप्रदायाच्या महान ग्रंथा प्रमाणे आवरण देवतांची मांडणी आहे. यात अष्टविनायक व इतर देवता आहेत. या आवरण देवतांची विशिष्ट क्रमाने पूजा करावी आणि दर्शन घ्यावे अशी परंपरा आहे. यास नित्य यात्रा म्हणतात.

मंदिरामध्ये नग्नभैरव, शमीविघ्नेश, मंदारगणेश, दुर्वादेवी, अष्टविनायक, द्वार देवता, भृशुंडीमहाराज, शूर, महाशूर, शुक्लचतुर्थी, कृष्णचतुर्थी, खंडोबा, रेणुकामाता, गवराईमाता, हनुमंत, साक्षविनायक, अन्नपूर्णाचिंतामणी, मोरया गोसावी, कल्पवृक्ष विनायक, नवग्रह, गणेश योगीन्द्र, विद्याहर मयुरादेवी, बल्लाळविनायक, श्रीगुरुदत्त, नागदेवता, मोद प्रमोद, नंदिकेश्वर, महामूषक या देवता आहेत.

मंदिरात प्रवेश केल्यावर पश्चिमेच्या बाजूला विघ्नहर गणपतीच्या ओवरी मध्ये बसून श्री मुदग्‌ल ऋषिंनी मुदग्‌ल पुराण हे महान पुराण लिहिले. मुख्य मंदिरात गर्भागार, मुख्यागार, तीन मंडप देवता आहेत. त्यांची पूजा करुन दर्शन घ्यावे.

मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणेजिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हेरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.


आख्यायिका – (moreshwar)

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.

या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव का मिळाले
यासंबंधी मुद्गल पुराणातील सहाव्या खंडात एक कथा आहे.

फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला. त्याचे नाव सिंधू. सिंधुनेही सूर्याची उपासना करून अमरत्वाचा वर मिळवला. त्यामुळे सिंधू उन्मत्त झाला. अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळावे असे त्याला वाटले. मग त्याने पृथ्वी जिंकली. इंद्राच्या अमरावतीवर त्याने स्वारी केली. इंद्राचा अगदी सहज पराभव केला. त्याने स्वर्ग व्यापला; तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरु केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता येईना.

सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूला वश केले व त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक व कैलास यांवरही स्वारी करण्याचे ठरवले. सर्व देवांना त्याने गंडकी नगरीत बंदिवासात टाकले. तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी गणेशाची आराधना सुरु केली. प्रसन्न झालेल्या गणेशाने देवांना आश्वासन दिले. मीलवकरचपार्वतीच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधूच्या जाचातून सुटका करीन.

सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरूपर्वतावर राहत होते. पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता ती गणेशमूर्ती सजीव झाली. ती बालकाचे रूप घेऊन पार्वतीला म्हणाली, ”आई, मी तुझा पुत्र होऊन आलो आहे.’ याच वेळी गंडकी नगरीत आकाशवाणी झाली, ‘सिंधुराजा, तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे.”

गणेशाचे व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले. गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले. कमलासुराच्या मस्तकाचा भाग जेथे पडला ते ठिकाण म्हणजेच मोरगाव क्षेत्र. मग गणेशाने सिंधू राजाचा पराभव केला व सर्व देवांची मुक्तता केली. तेथेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. मोरावर बसून गणेशाने दैत्यसंहार केला, म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर म्हणतात व त्या स्थानाला मोरगाव असे नाव मिळाले.


कऱ्हा नदी – (moreshwar)

मोरगाव(moreshwar) कऱ्हानदीच्या काठवर वसले आहे. य कऱ्हानदीच्या उत्पत्तीबद्दल एक आख्यायिका आहे. एकदा ब्रम्हदेवाकडून श्रीसरस्वतीचा विनंयभंग झाला. त्या पातकाने तो अस्वस्थ झाला. चित्तशुद्धीसाठी जगातल्या सर्व तीर्थयात्रा त्याने विधिपूर्वक केल्या व सर्व तीर्थतील उदक आपल्या कमंडलूत भरूनआणले. तारीही त्याच्या चित्ताला शांतता लाभली नाही. तेव्हा तो मोरगावाला आला व त्याने श्रीमयुरॆवराचे पूजन करून त्याच्यावर अभिषेक केला.

श्रींना प्रदक्षिणा घालत असताना सर्व तीर्थांनी भरलेला कमंडलू ब्रम्हदेवाचा पाय लागून लवंडला. ब्रम्हदेवाला दुःख झाले. तो ते तीर्थ कमंडलूत भरू लागला. तेव्हा गणेशाने त्याला सांगितले “ब्रम्हदेवा हा कमंडलू भरू नको. सर्व जगातील तीर्थ एकत्र होऊन जगातल्या पापक्षालनासाठी श्री ब्रम्हकमंडलू कऱ्हागंगा या नावाने नदीरूपाने येथे वाहू दे. यातले एक पळीभर तीर्थ घेऊन तू पावन हो.” अशाप्रकारे कऱ्हागंगा मोरगावात अवतीर्ण झाली. कऱ्हा नदीच्या पाच मैलांचे प्रवहत श्रीगणेशतीर्थ, भीमतीर्थ, कपिलतीर्थ, व्यासतीर्थ, ऋषीतीर्थ, सर्वपुण्यतीर्थ आणि श्रीगणेशगया तीर्थ अशी सात तीर्थे आहेत.

कर्‍हागंगेच्या उत्तरेला एका मैलावर श्रीजडभरताचे स्थान आहे. पूर्वी त्या ठिकाणी त्याला मोठा आश्रम होता. आता त्याचे स्मारक म्हणून फक्त एक शिळ आहे. त्या शिळेवर महादेवाची पाच लिंगे आहेत. क्षेत्रांतर्गत यात्राविधानात श्रीजडभरत शिळेचे दर्शन घेणे आवश्यक आहे.


नग्नभैरेव – (moreshwar)

मोरगावच्या(moreshwar) पूर्वेला एका मैलावर देवागराचे सीमेवर नग्नभैरवाचे मुख्य स्थान आहे. त्याचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. तेथे गुळ समर्पण करून नारळ फोडावा लागतो. मोरगाव क्षेत्राचा तो क्षेत्रफळ असून तो गणेशभक्तांचे पालन करतो व त्यांचे धनधान्यादि वाढवतो. ह्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास देवळाच्याजवळ गाभाऱ्याबाहेर श्रीनग्नभैरवाचे जे छोटे देऊळ आहे तेथे हे विधी पूर्ण करता येतात.


उपयुक्त माहिती – (moreshwar)

मोरगाव(moreshwar) देवस्थान, चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली आहे. देवस्थान तर्फे सेवेकरी वंशपरंपरागत आहे. देवस्थानतर्फे योग्य ती देणगी घेऊन अभिषेक, सहस्त्रवर्तने एकादशणी केली जाते. देवस्थानतर्फे भोजनाची सोय आहे.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

Source Wikipedia

Whether you’re a first-time homebuyer or an experienced homeowner, https://www.webuyhouses-7.com/illinois/we-buy-homes-joliet-il/ has everything you need to know about buying a home in Florida.