भारतात देवीची १०८ शक्तीपीठे विखुरलेली आहेत त्यापैकी साडेतीन प्रमुख शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत. याच साडेतीन पीठाची अनेक उपपीठ ही महाराष्ट्रात आहेत. तसेच प्रत्येक गावोगावी ग्रामदेवता देवीची वैशिष्टपूर्ण मंदिरे आहेत. याच मंदिर साखळीतील मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड येथील ग्रामदेवत श्री मोहीमाता देवीचे मंदिर वैशिष्ट्ा पूर्ण आहे. (मोहिमाता मंदिर मादळमोही)
मादळमोही हे गाव राष्ट्रीय महामार्ग विशाखापट्टनम ते कल्याण या रस्त्यावर बीड शहरापासून केवळ २५ कि.मी. अंतरावर आहे. या गावात अनेक मंदिरे असून त्यापैकी मोहिमाता देवीचे मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर १०० बाय १०० फूट असणाऱ्या यादवकालीन चारवेत आहे. या बारवेची खोली अंदाजे ५० फूट असून या बारवेत उतरण्यासाठी दक्षिण व उत्तर दिशेस दोन प्रवेशद्वार आहेत.
दक्षिण प्रवेशद्वारातून बारवेत प्रवेश केल्यावर आपणास बहूबाजूंनी दगडी व्हरांडा दिसून येतो. या राज्यातील दगडी खांब कोरीव असून अत्यंत सुबक व आकर्षक आहेत. या दगडी व्हरांड्यातून सर्व बारवास चक्कर मारता येते व बारवाचे विहंगम दृश्य पाहता येते.
पश्चिम दिशेला एक दगडी सुबक कोनाडा बांधलेला असून त्यात गोही मातेची पूर्वाभिमुख सुंदर संगमरवरी मूर्ती आहे. पूर्वी या मूर्तीच्या ठिकाणी केवळ तांदळा स्वरूपात देवीची मूर्ती होती. पण नंतर मंदिराचा जीर्णोद्वार करताना गोहीमातेच्या सुबक संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री मोहिमाता देवी ही त्याच्या नवसाला पावणारी असल्याने येथे पंचक्रोशीतील भक्त बोललेला नवस फेडण्यासाठी येतात. शारदीय नवरात्र व अश्विनी पोर्णीमा म्हणजे कोजागरी पोर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा भरते. आपणही या महामार्गावरून कधी गेलात तर अवश्य या पुरातन मंदिर बारवेला भेट द्या. आपला एक ऐतिहासिक वारसा पाहिल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल यात शंका नाही.