संत माणकोजी बोधले मंदिर धामणगाव
बालेघाटाच्या पायथ्याला नागझरी नदीतीरावर वसलेले छोटेसे गाव म्हणजे धामणगाव. धर्मेश्वराच्या प्राचीन मंदिरावरून त्या गावास धार्मण्यपूर असे नाव पडले. त्याचा अपभ्रंश झाला धामणगाव. त्याच गावात श्री संत माणकोजी बोधले महाराजांचा जन्म झाला. पांडुरंग धामणगावात आहे की! बोधले महाराज विठ्ठलमूर्ती घेऊन धामणगावी आले.
संत माणकोजी बोधले मंदिर
विठ्ठलाचा पालखी सोहळा धामणगावनगरीत पाच दिवस उत्साहात साजरा होतो. पौर्णिमेला दहीहंडी फुटते. देव काला घेऊन पंढरीला निघून जातात. जीवनकार्य पूर्ण करून शके १६१६ ज्येष्ठ वद्य तृतीया या दिवशी संत माणकोजी बोधले यांनी संजीवन समाधी घेतली. संत माणकोजी बोधले यांचे बंधू शिवाजीराव पुढे मराठवाड्यात निघून गेले. त्यांचे वंशज प्रकाश महाराज बोधले उस्मानाबाद जिल्ह्यात असतात. माणकोजींची परंपरा ‘धामणगावी’ चालू राहिली. बराच काळ त्यास संस्थानाचे स्वरूप आले, परंतु विद्यमान विवेकानंद बोधले यांनी ख्याती संपादन केली आहे.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या